Monday, October 11, 2021

काकडीचा केक/ धोंडस/ काकडीचे घेवदेे❤️

 घेवदे! ❤️


Cucumber-jaggery- Semolina Cake!🥒🌾❤️

A delicious treat... Made by Aai Rashmi Indulkar


#काकडीचा केक/ धोंडस/ काकडीचे घेवदे


काकडीचे घेवदे म्हणजे कोकणातील एक सुरेख गोडूस पदार्थ! ज्याला गावी धोंडस तर आम्ही काकडीचा केक बोलतो. बनवायला तसा कमी कटकटीचा पण वेळखाऊ. 


पौष्टिक आणि रूचकर. ही रेसिपी आई रश्मी इंदूलकर यांनी दिली आहे. कोकणात गणपती गौरी च्या दिवसात हमखास हा पदार्थ केला जातो व मायेने आजूबाजूच्यांना पाठवण्यात येतो. गावरान मोठ्ठठ्या काकड्या आणि देशी गुळ ही याची खासियत. चुलीवर करता आला तर उत्तमच... खरपुस आणि छान सोनेरी रंग येतो ह्या गावरान केकला...


साहित्य बघा काय काय लागते...

 • एक वाटी लापशी रवा

 • दिड वाटी गुळ 

 • दोन वाटी मोठ्या गावरान काकडीचा/ तवसाळीचा बारीच खिस

 • एक लहान वाटी शेंगदाणे

 • एक लहान वाटी मनूका

 • 10-12 सुक्या खोबरेचे अगदी पातळ कापलेले तुकडे

 • हिरवी वेलची पावडर एक लहान चमचा

 • किंचित मीठ 

 • चिमुटभर साखर

 • दोन वाट्या तेल (ह्यातले थोडे आपण परत काढून ठेवतो)

 • अर्धी वाटी तुप


लागणारी भांडी आणि इतर गोष्टी: 

 • जाड बुडाचे पातेले

 • आठ-दहा कोळसा तुकडे

 • एक मोठी परात वा ताट


चला सुरूवात करूया काकडीचा मस्त केक बनवायला...


 • प्रथम जाड निवडलेला लापशी रवा थोड्याश्या पाण्यात तासभर भिजवून उमलू द्या. मग त्यात चिरलेला गुळ व बारीक खिसलेला गावरान काकडीचा/ तवसाळीचा खिस टाकून मिश्रण एकजीव करा. 


 • आता एक लहान वाटी शेंगदाणे, एक लहान वाटी मनूका, 10-12 सुक्या खोबरेचे अगदी पातळ कापलेले तुकडे आणि हिरवी वेलची पावडर एक लहान चमचा, किंचित मीठ व चिमुटभर साखर घालून पुन्हा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. परत दिड दोन तास झाकून मुरवत ठेवा.


 • कोळसे पेटवून तयार करत ठेवा. जाड बुडाचे पातेले घेऊन ते गरम करा. मग गॅस बंद करून त्यात खुप तेल अथवा तूप टाका. पातेले वरखाली फिरवून तेल/ तुप सर्व बाजूला लागेल असे पसरवून घ्या. मग हे भिजवत ठेवलेले मिश्रण या भांड्यात आतून व्यवस्थित पसरवा. आणि वरती परातीचे झाकण मंद आचेवर शिजवत ठेवा. अर्ध्या तासाने झाकण काढून पहा, जास्तीचे तेल वर आले असेल ते सगळे काढून घ्या व इतर स्वयंपाकास वापरा.


 • आता परत परातीने झाका, व गॅस मंदच राहू द्या. परातीवर पेटते तयार निखारे ठेऊन द्या. साधारणपणे, दिड दोन तासात मऊ चवदार काकडी केक म्हणजे खाकडीचे घेवदे तयार होते. 

(केक जास्त जळू नये म्हणून गॅसवर जाड तवा ठेऊन मग त्यावर आम्ही केकचे पातेले ठेवतो.)


 • जेव्हा एखाद तासाने झाकण काढाल, तेव्हा केकमध्ये सुरी घालून पहा... जर स्वच्छ बाहेर आली तर केक झाला म्हणून समजा. छान गोडूस वासही किचनभर दरवळेल.


 • केकचे पातेले थोडे थंड होऊ द्यावे व नंतर दुसरे ताट घेऊन त्यात उलटे करावे, मस्त सोनेरी झाक असलेला केक बाहेर येईल. त्याचे तुकडे करून  छान पैकी सर्व्ह करा.


काकडी केक चे तुकडे सर्व्ह केल्यानंतर त्यावर गावठी मध हलकेसे टाकून देखिल तुम्ही देऊ शकता.








यातल्या गुळ काकडी रसात, टम्म फुललेल्या मनूका वेचून खाण्यात भारीच मज्जा येते. :)


#cucumber_cake #ghevade #kakadi_cake #dhondas  #cucumber_recipe #kokan #kokani_food #traditional_recipes #tavasale

No comments:

Post a Comment