Sunday, April 15, 2018

Kolhapuri Kanda-lasun Masala

काही खास मुलखांच्या मसाल्यांना त्या प्रांताच्याच नावानुसारच ओळखले जाते. त्यातलाच एक अतिशय प्रसिद्ध मसाला म्हणजे कोल्हापूरचा "कोल्हापूरी कांदालसूण मसाला"! त्यालाच कोल्हापूरी चटणी देखील म्हणतात.

लग्नानंतर अभिषेकसोबत कोल्हापूर फिरत होते तेव्हाच अंदाज येत होता आधीपासूनच ऐकिवात असलेला कोल्हापूरचा ठायीठायी आढळणारा खव्वय्येपणा! आणि लहानमोठ्या हाॅटेलमधून दिसून येत होता. कोल्हापूरी मिसळ, तांबडा-पांढरा रस्सा, राजाभाऊंची भेळ, अख्खा मसूर, मस्त भन्नाट फालुदा आणि फ्रुटसलाड आणि बरेच काही "कोल्हापूर स्पेशल" वर मनसोक्त आस्वाद घेतल्यावर मग "लई च झक्कास" कोल्हापूरी कांदा लसूण मसाल्याकडे स्वारी वळवली.

कोल्हापूरी कांदा-लसूण मसाला म्हणजेच कोल्हापूरची मसाला चटणी ही कोल्हापूर, कराड तसेच सातारा ह्या प्रांतातील स्वयंपाकात विशेष करून वापरतात. ओलसर आणि मस्त गडद लाल असा हा अफलातून "एक नंबर" मसाला बहुदा सगळ्यांनाच आवडतो. हा मसाला सर्व शाकाहारी भाज्या, मिसळ, उसळ, मटण, चिकन, आमटी अशा बहुतेक सगळ्याच पदार्थांमधे वापरला जातो.
कोल्हापूरी तर्रीदार मिसळ, वांगी-बटाटा भाजी किंवा मटण-चिकन, अंडाकरी असे पदार्थ तर अतिशय चविष्ट बनवतो हा मसाला!

उन्हाळा सुरु झाला की महत्वाच्या वार्षिक कामातले हे एक काम असते. एकदा व्यवस्थित बनवला की वर्ष- दिड वर्ष छान टिकतो.
तिखट आणि रंगाच्या विविध मिरच्या आणून त्यांना वाळवून, कुटून, मिरची पूड करावी लागते, मग बाकी सर्व गरम मसाले, आले, लसूण, हिरवी मिरची असा ओला मसाला, खोबरे आणि हो हिरवीगार कोथिंबीर देखील घरी आणून मग त्याची चटणी करतात. कोल्हापूरला विशेषतः तिखटपणासाठी जवारी मिरची आणि रंगासाठी ब्याडगी (बेडगी) मिरची वापरतात.
आणि एकदम वर्षभराचा मसाला बनवला की रोजचा स्वयंपाक करणे सोईचे होते.
फक्त बारीक चिरलेला कांदा, आले-लसूण पेस्ट आणि मीठ ह्यावर "कोल्हापूरी कांदा लसूण मसाला" टाकून परतले आणि त्यामधे आवडीनुसार कापलेल्या शाकाहारी भाजी किंवा चिकन-मटणाचे तुकडे टाकून शिजवा. त्यावर कापलेली कोथिंबीर आणि लिंबू रस पिळला कि मस्त चमचमीत तर्रीबाजी भाजी तयार. :)

असा हा Multipurpose आणि रोजच्या वापराचा
गि-हाईकांच्या आवडीचा तिखटसर कोल्हापूरी मसाला "दि मसाला बझार" विरार स्टोअरमध्ये 12 ही महिने मिळतो. स्वस्त आणि उत्तम चव असल्याने हाॅटेलवाले, कॅटरस् आणि खाणावळ वाल्यांनी देखिल हा मसाला अल्पावधीतच उचलून घेतला.

तुम्हाला देखील कोल्हापूरी कांदालसूण मसाला हवा असल्यास "दि मसाला बझार" विरार स्टोअर ला 9890043675 संपर्क साधा.

#kolhapuri_masala #kolhapur_food #spices_virar #kandalasun_masala #kandalasun_chuteney #laxmimasale_edwan #edwan_masale #vadval_masala #the_masala_bazaar #themasalabazaar