Tuesday, October 12, 2021

नाचणीची खीर

 नाचणीची खीर!

ह्या पावसाळी मौसमात गरमागरम खीर प्यायला अजुनच मज्जा येते. 🙂

नाचणी पौष्टिक मुल्यामुळे आजकल तुफान लोकप्रिय आहे. नाचणीची भाकरी किंवा हातपोळे ब-यापैकी घरी केले जातात पण दुसऱ्या कोणत्याही प्रकारे घरी नाचणी खाल्ली जात नाही. आत्ता थोडेसे ऊन पडायला लागलेय म्हणून थंड गुणाची नाचणी खायची हुक्की आली. शरयु देशपांडे दिदी ह्या आवडत्या सुगरणची नाचणीची अप्रतिम खीर/पेज ची पोस्ट पाहिलेली तेव्हापासूनच कधी एकदा करते असे झालेले होते. नाचणीची अशीच खीर/ पेज लहानपणी कधीतरी मम्मी बनवायची तेव्हा खाल्लेली, ती चव जीभेवर आणि मनामधे तरळली. नाचणीच्या पेजेवर जमणा-या चविष्ट जाडसर सायीचे शरयुदी ने केलेले वर्णन जेव्हा खिरीवरची साय चाखली तेव्हा तंतोतंत उमगले. 


अत्यंत सोपी, माफफ साहित्य वापरून झटपट होणारी ही खीर, चवीला निव्वळ अप्रतिम. अख्खी नाचणी घेऊन मिक्सरला बारीक पावडर केली. नाचणीच्या दुप्पट किसलेला गुळ आणि पाच पट उकळून थंड केलेले दुध घेतले. तुम्ही प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या.


दुध गॅसवर उकळवत ठेवले आणि वाटीमधे नाचणी पावडर पाण्यामधे गुठळ्या न होता भिजवून घेतली. दुधाला उकळी आल्यावर त्यात हळूहळू भिजवलेली नाचणी मिसळली. नंतर किसलेला गुळ मिसळला. ढवळत ढवळत सारे एकजीव केले. गुठळी होऊन दिली नाही. आणि मग दोन चमचे घरी कढवलेले साजूक तुप टाकले. खीर दाट होईस्तोवर वर सतत ढवळले.










आणि मग गॅस बंद केला. थोड्याच वेळात छान साय जमा झाली‌. खीर मस्त सर्व्ह करून आव्हाद घ्या. थंड किंवा गरम दोन्ही प्रकारे केवळ अप्रतिमच लागते ही खीर!


#नाचणी_खीर #nachani_kheer #sweet #jaggery #nachani #ragi #kheer




No comments:

Post a Comment