तयारी उकडीच्या मोदकांची! 😋🌿
पाण्याच्या प्लॅंटच्या बाजूच्या जागेत रूजवलेल्या इटुकल्या पिटुकल्या बागेमधून कर्मचा-यानी निघताना, आज अंगारकी म्हणून, मस्तपैकी ताजी ताजी केळीची, हळदीची आणि अन्नपुर्णा ची पाने आणली. गंमत वाटते नेहमीच अशी लहान लहान Harvest घरी वापरायची... किती मोठा आनंद असतो हा आपल्यासाठी...
आम्ही मोदक उकडवताना ह्यापैकी कोणत्याही पानाचा खाली base म्हणून वापर करतो. प्रत्येक पानाचा सौम्य हवाहवासा सुगंध असतो मोदकाला... मला हळदीच्या पानात ले मोदक जास्त आवडतात.
मोदक उकडताना हळदीची पाने, केळीची पाने, अन्नपुर्णाची पाने ह्यापैकी तुम्ही कोणती पाने वापरतात?😁🌿
#मोदक #modak #haladi #termericleaf #annapurna #pandanleaf #bananaleaf #flavouring #simplethings #littlegarden





No comments:
Post a Comment