Tuesday, October 12, 2021

लिंबाचे_क्रश_आंबट-गोड-तिखट लोणचे 🍋🌿❤️

 #लिंबाचे_क्रश_आंबटगोड लोणचे आणि

#लिंबाचे_क्रश_आंबट-गोड-तिखट लोणचे

🍋🌿❤️


लिंबू वर्षभर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. आणि आजकल छान रसरशीत पिवळीधम्मक लिंबे बाजारात दिसतात. स्वस्तही असतात. मग त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे भरता येते. 🍋🍋


आजचे लोणचे हे आमच्या घरी वरचेवर होतच असते. वर्षभरासाठी एकदाच भरपुर लोणचे आम्ही भरून ठेवत नाहीत.  आई रश्मी इंदूलकर ची ही पाककृती आहे. ती सर्व अगदी निगुतीने करते. 🙂💁 आईला स्वयंपाकाची, पारंपारिक पाककृतींची, आयुर्वेदाची खुप आवड आहे. मी पोस्ट करत असलेल्या अनेक सा-या पाककृती ह्या आईकडूनच घेतलेल्या आणि शिकलेल्या आहेत. छान छान पदार्थ बनवून सर्वांना खायला द्यायला ही तिला भरपुर छान वाटते. लोणचे वैगरे बनवले की मस्तपैकी हौसेने सर्वांना देते. ❤️


लिंबूच्या दोन‌ चवींची, आंबट-गोड आणि तिखट-आंबट-गोड अशी लोणची आई एकदाच बनवते. अगदी सोपी पध्द्त नेहमीप्रमाणेच... 


साहित्य:

१. पाच ते सहा लिंबू

२. साखर किंवा गुळ (लिंबाच्या अर्धा पट‌ किंवा जास्त गोड हवे असल्यास जास्त प्रमाण घ्या)

३. मीठ चवीनुसार

४. तेल

५. राई

६. कमी तिखट मिरची पावडर


लिंबे स्वच्छ धुवून पुसून घ्या. आणि कापून त्यातल्या बिया काढून टाका. आता लिंबू मिक्सरमधून भरडून काढा. बारीक करू नका. जाडसर भरडा. लिंबाच्या भरडेमधे थोडीशी कमी तिखट काश्मिरी मिरची पावडर टाका.


गॅसवर कढईत तेल गरम करा. राई आणि हिंगाची फोडणी करा. त्यातच मीठ टाका. किसलेला गुळ किंवा साखरेचा पाक करा. जरा थंड झाल्यावर ह्यामधे भरडलेले लिंबाचे‌ मिश्रण ओतून, छान एकजीव करा. लोणचे तयार 💁🍋


आधी कडवट लागते पण दोन-तीन दिवसांत छान मुरते आणि आंबटगोड लिंबू क्रश चपाती बरोबर छान लागतो. लहानमुले ही आवडीने खातात.💁😍


तिखट लोणचे बनवायचे असल्यास तीच पध्दत...  फक्त लिंबाच्या भरडमधे गुळ/ साखर अगदीच कमी टाकयची आणि लोणचे मसाला टाकायचा. मिक्स करायचे. लिंबाचे आंबट-गोड-तिखट लोणचे फटक्यात तय्यार! ❤️💁🍋


दोन-तीन दिवसांत मुरले की बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.


#lime_pickle #lemon #pickle

#laxmi_masale #themasalabazaar






No comments:

Post a Comment