Thursday, August 5, 2021

चंपारण लसुणी हंडी चिकन


लाॅडाऊनच्या सुरवातीला कधीतरी Facebook‌ वर येणारे Foodbloggers चे व्हिडिओ पाहताना अभीला चंपारण लसुणी हंडी चिकन ची एकदम गावरान रेसिपी पहायला मिळाली. बिहार येथील लोकप्रिय अशी डीश आहे ही. Abhiee is a decent cook! जे पण बनवतो ते हौसेने... त्याला साध्या सोप्या पाककृती आणि पदार्थ आवडतात आणि बनवतानाही तो अगदी मोजके बनवतो म्हणजे 'पुरून उरेल' नाही पण 'वाढून संपेल' असे. मग चंपारण चिकन साठीची up to date साहित्य यादी त्याने काढली, मी ह्यावेळी सहाय्यक च्या भुमिकेत होती. काळ्या रंगाची उभट सुगड आणि एक पसरट विटकरी लंगडी आईने सकाळीच चकचकीत धुवून ठेवली. सरसों का तेल घरी आणून ठेवले गेले. गावठी अख्खे लसूण देखील होतेच. ते नंतर वापरले. खडा मसाला घेऊन, परतून, पावडर करून वापरला. ती खासियत आहे ह्याची..


ह्या पाककृती पध्द्तीमधे चिकनला 'दम' देऊन शिजवतात. दम दिल्यामुळे मसाल्यात परतलेले चिकन, मातीच्या भांड्यात अजूनच चविष्ट लागते. अख्खे लसूणाचे कांदे देखील टाकतात. उकडलेला‌ किंवा शिजलेला मसालेदार लसूण खुप जबरदस्त लागतो. हा पदार्थ चपातीसोबत अधिक चांगला लागतो पण आम्ही त्यादिवशी ब्रेडबरोबर आस्वाद घेतला.


सरसों म्हणजेच राईचे तेल लंगडीमधे गरम करून पाणी टाकून फाडले अभीने अगदी काळजीपूर्वक अर्थातच... आणि तेव्हा कुठे तो तेलाचा उग्र वास गेला आणि जीवात जीव आला. या चिकनची पाककृती युट्युबवर अगदी विस्तारित स्वरूपात मिळेल. आखाडीला जमल्यास वेगळे म्हणून नक्की करून पहा. गावठी चिकन आणि चुलीचा वापर करता आला तर चवीमधे अजूनच अव्वल होईल. हंडीला लावलेले पीठ काढले की विशिष्ट दरवळ जिव्हेला आव्हान देतो. एकंदरीत मंद आचेवर शिजलेले हे मसालेदार चंपारण चिकन हांडी खुप चविष्ट लागते. नक्की बनवा. 

.

.

‌.

.

.

.

#चंपारण_चिकनहांडी #हंडीचिकन #बिहार #champaran_chicken_handi #handi_chicken #laxmimasale #themasalabazaar