Monday, October 11, 2021

सुरण-बटाटा-वरी तांदूळ चे उपवासाचे सोपे पॅटिस

 • सुरण-बटाटा-वरी तांदूळ चे उपवासाचे सोपे पॅटिस


१. सोलून‌ तुकडे केलेले तीन बटाटे आणि साधारण तेवढाच होईल असा सोलून तुकडे केलेला सुरण एका भांड्यात मीठ आणि अगदीच थोडेसे पाणी घालून दोन-तीन शिट्या करून उकडून घेतले. कुकरमध्ये बटाटे- सुरणाच्या वर दुसऱ्या भांड्यात थोडासा वरीचा भात उकडून घेतला. 

२. तीन्ही गोष्टी थंड होईपर्यंत मुठभर कोथिंबीर, एक मिरची आणि थोडे आले अगदी बारीक चिरून घेतले. मीठ आणि जीरा पावडर, लिंबू रस, अख्खे जीरे, थोडेसे वरी आणि साबुदाणा पीठ घेऊन मिसळून ठेवले.

३. बटाटा, राताळी, वरी भात थंड झाल्यावर बोटाने फोडून वरील जिन्नस घातले आणि तुपाचा हात लावून छान एकजीव केले. जास्त मळायचे नाही नाहीतर लगदा होतो.

४. गोळे करून तुपावर शॅलो फ्राय करत सोनेरी-ब्राऊन रंगावर तळून घेतले. 

अगदी खुसखुशीत होत नाहीत हे पॅटिस पण चांगले लागतात चवीला.






No comments:

Post a Comment