Thursday, March 28, 2019

Prawns Biryani / कोलंबी_भात

#कोलंबी_भात

लक्ष्मी मसालेचा बिर्याणी पुलाव मसाला वापरून केलेला चमचमीत कोलंबी भात!

कोलंबी भात म्हणजे One_pot_recipe म्हणून आधीपासूनच माझा आवडता पदार्थ... एडवणला मस्त भाकरी आणि कोळंबी ची आमखंडी, तळलेले पापलेट, बोयमासेचे कालवण आणि कोलंबी भात म्हणजे अफलातून भन्नाट Seafood combination असायचे.

भाताचे अनेक-विविध प्रकार असतात. काही गोडसर, तिखट, थर लावून केलेले आणि निरनिराळ्या भाज्या टाकून केलेले आणि अनेक त-हेत-हेच्या पध्दतीने बनवलेले...
शाकाहारी किंवा मांसाहारी अशी कोणतीही बिर्याणी, भाताचा प्रकार अथवा पुलाव बनवण्यासाठी लक्ष्मी मसालेचा बिर्याणी पुलाव मसाला वापरता येतो.

पुर्वी फक्त समारंभात हमखास केला जाणारा बिर्याणी- पुलाव हा भाताचा प्रकार आजकल घरोघरी वरचेवर केला जातो. खाली दिलेल्या साहित्याची यादी जरी मोठी वाटली 20 एकदा पध्द्त समजून बनवली की परत बिर्याणी किंवा कोलंबी भात बनवणे तितकेही अवघड नाही.

साहित्य पाहून घ्या.

साहित्य:
दोन वाट्या बासमती तांदूळ किंवा तुमच्या आवडीचा तांदूळ  (एक तास भिजवलेला)
15-20 मध्यम आकाराच्या कोलंबी
एक लहान गाजराचे सोलुन कापलेले लांब व बारीक तुकडे (आवडत असल्यास)
दही अर्धी वाटी
आले लसूण वाटण
लिंबू रस एक लिंबूचा

हिरवी मिरची 4 मधे उभी चिर पाडून
लसूण पाकळ्या 7-8, बारीक उभ्या चिरून
आले एक इंच- अगदी बारीक तुकडे करून
दोन वाट्या कोथिंबीर बारीक चिरून
एक वाटी पुदिना चिरून
दोन कांदे उभे चिरून
तीन टाॅमेटो चिरून

मसाल्याचे पदार्थ:
दोन मसाला वेलची
सहा हिरवी वेलची
तीन-चार दालचिनी तुकडे
चार तमालपत्र
आठ दहा काळेमिरे
चार लवंगा
थोडेसे शहाजीरे
एक जायवंत्री
थोडी कसूरी मेथी
मीठ
चिमुटभर साखर
तेल व तुप
लक्ष्मी मसालेचा बिर्याणी पुलाव मसाला दोन ते तीन चमचे
थोडेसे काजू
थोडेसे बेदाणे
बिरिस्ता (तळलेला कांदा)

पाच सहा केशरकाड्या घातलेले कोमट दुध
गव्हाचे मळलेले पीठ

चला सुरूवात करूया चविष्ट कोलंबी भाताला! वरील जिन्नसाची  यादी खुप मोठी लांबलचक वाटली तरी पध्दत सोपी व सुटसुटीत आहे.

१. एका भांड्यात मोजके तेल गरम करा. त्यात चिरलेला लसूण- आले, कांदा व टाॅमेटो आणि कोथिंबीर तळा. मग हे थंड झाल्यावर मग मिक्सरमध्ये बारीक प्युरी करा व बाजूला ठेवा.

२. परत त्याच भांड्यात तेल गरम करा. मग सगळे अख्खे खडे मसाले तेलात तडक्याला टाका. नीट परता. मग चिरलेला कांदा टाकून सोनेरी रंगावर तळून घ्या. आलेलसूण पेस्ट टाका. थोडे काजू व बेदाणे पण टाका.

३. आता आधीच बनवलेली कांदा टाॅमेटो प्युरी टाकून ढवळा. मग हिरवी मिरची, आले, लसूण, थोडी कोथिंबीर व थोडा पुदिना, कसूरी मेथी, मीठ, साखर, लक्ष्मी मसालेचा बिर्याणी पुलाव मसाला दोन ते तीन चमचे, दही सारे टाकून व्यवस्थित परता. पाच मिनिटं शिजू द्या. लिंबू रस पिळा.

४. मग सर्व सोललेल्या कोलंबी व एक तास भिजवलेला बासमती तांदूळ टाकून व्यवस्थित परता. आणि थोडेसे तूप घालून नीट ढवळा.

५. एक कप कोमट दुधामध्ये भिजत ठेवलेले केशर शिंपडा व हलकेच ढवळून घ्या. आणि अंदाजे थोडे पाणी ओतून कुकरला तीन शिट्या करून घ्या.

६. वाफ गेली कि झाकण खोलुन, हलकेच भात वरखाली करा. तळलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, चिरलेला पुदिना याचा भातावर थर दया, तळलेले काजू वरून टाका.

जर  कोलंबी भाताला दम द्यायचा असेल तर, गव्हाचे पीठ लावून झाकण चिकटवून ठेवून तव्यावर भांडे ठेवावे व तव्याला १० मिनिटे मंद आचेवर ठेवून दम मिळू द्यावा.

झाकण काढले की छान सुगंध येतो. तर मग  तयार गरमागरम कोलंबी भात सफेद कांदा -दह्याच्या रायत्या बरोबर सर्व्ह करा.

हा भात अनेक वेगवेगळ्या भाज्या वापरून करता येते.
नुस्ते मशरुम्स् किंवा भोपळी मिरची-गाजर-मटार-फ्लॉवर combination वापरून देखिल बनवता येते.

लहान-थोर सगळ्यांना नक्की आवडेल.

#कोलंबीभात #prawns_biryani #laxmi_masale_edwan #laxmi_masale #spiceblends_virar #masala_bazaar #biryani_pulav_masala #biryani_masala #pulav_masala #spice_blends_edwan













1 comment:

  1. Very informative and impressive post you have written, this is quite interesting and i have went through it completely, an upgraded information is shared, keep sharing such valuable information. Sticky Chai

    ReplyDelete