Friday, March 22, 2019

Bombil Thecha/ सुक्या_बोंबलाचा_ठेचा

#सुक्या_बोंबलाचा_ठेचा

समुद्र किनारी वसलेल्या एडवण गावी ताज्या मासोळ्यांबरोबरच उत्कृष्ट दर्जाची सुकी मच्छी मावरे मिळते. समुद्रकिनारी मस्त बोंबिल आणि अन्य मासे खाऱ्या वाऱ्यावर उन्हात सुकण्यासाठी ओलाणीवर रांगेत टांगलेले दिसतात. सोडे बनवण्यासाठी कोलंबी आणि करंदी, जवळा ठिकठिकाणी जमिनीवर पसरतात. सुकी मच्छी अडिअडचणीत किंवा  घाईघाईने ताजे मासे आणता नाही आले तर वापरता येते. सुक्या मच्छीचे पदार्थ छानच लागतात पण अर्थात सर्वांनाच सुकी मच्छी आवडतेच असे नाही.
आज आपण पाहणार आहोत हा साधासोपा सुक्या बोंबलाचा ठेचा बनवतात कसा...
आपल्याला लागणार आहेत दहा सुके बोंबिल, पाच तिखट हिरव्या मिरच्या, दहा बारा लसूण पाकळ्या, मीठ, आवडत असल्यास लिंबाचा रस.

बोंबील गॅसवर किंवा चुलीमधे अगदी खरपुस आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या. थंड झाल्यावर मधोमध चिरुन काटा काढून टाका. हातानेच तोडत बोंबलाचे लहान लहान तुकडे करा. आता मोठ्या खलबत्त्यात किंवा पाटा वरवंटयामधे बोंबलाचे तुकडे, मिरच्यांचे तुकडे, लसुण पाकळ्या, लिंबू रस, मीठ सारे टाकून बारीक सर ठेचून घ्या. वरवंटा वैगरे नसल्यास हलकेच मिक्सरमध्ये फिरवा.
अफलातून चवीचा हा सुक्या बोंबलाचा ठेचा तांदळाची भाकरी, वाफाळता भात आणि शेंग कोलंबी कैरी भाजी बरोबर अप्रतिम लागते.
नक्की हा ठेचा बनवून पहा.

#बोंबलाचा_ठेचा #bombay_duck_chuteney
#bombil_thecha #dry_fish_recipes #edwan #laxmi_masale_edwan #the_masala_bazaar








1 comment:

  1. Great tips, many thanks for sharing. I have printed and will stick on the wall! I like this blog. Earl Grey Tea

    ReplyDelete