Thursday, October 3, 2019

Garam Masala/ गरम_मसाला

#Garam_masala #गरम_मसाला
#लक्ष्मीमसालेचास्पेशलगरममसाला

भारतीय मसाले हे त्यांच्या वैविधपुर्ण अनेक घटक, विशिष्ट चव, उग्र वास, आरोग्यदायी उपयोग आणि आकर्षक आकार व रंग ह्यासाठी जगप्रसिद्ध आहेत. ह्या बहुतांशी सर्वच खास भारतीय अथवा एशियन मसाल्यांच्या मिश्रणाने तयार होणारा Multipurpose all in one Brownish गरम मसाला म्हणजे आपणा भारतीयांच्या नेहमीच्या जेवणामधे हमखास लागणारा महत्त्वाचा घटक!
एडवणला आमच्या लक्ष्मी मसाले स्टोअरमधे दरवर्षी जानेवारी ते जून हा वर्षभराचे मसाले बनवणारे आणि भरणारे अशा ग्राहकांचा सिझन असतो. आमल्याकडे सर्व प्रकारचे दर्जेदार अख्खे मसाले, सहा प्रकारच्या मिरच्या, तयार पावडरी, चविष्ट घरगुती मसाले, चिंच, कोकम, निरनिराळी लोणची, अनेक प्रकारचे पापड व पीठे कमी किंमतीत मिळतात. त्यामुळे वर्षानुवर्षेपासून पंचक्रोशीतील ग्राहकांबरोबरच विरार, मुंबई, ठाणे, डहाणू अशा अनेक ठिकाणांवरून हौशी ग्राहक, सुगरण महिला आवर्जून अख्ख्या व तयार मसाल्यांसाठी उन्हा-तान्हाची व गर्दीची तमा न बाळगता हजेरी लावतात. खुप आवडीने वर्षभराचे सामान गाड्यांमधे घे-घे करतात.

जेव्हा ह्या महिला मसाले घ्यायला येतात तेव्हा 25 वाणे मसाल्यांच्या सामानाची नावे व प्रमाणे आपण ज्याच्या-त्याच्या कलेने, आवडीने आणि हो काही वेळा त्यांच्या बजेटनुसार आपण बनवून देतो. वाङवळी, कुणबी, ब्राम्हण, सोनार, सुतार, कोळी, आगरी आणि अशा विविध लोकांच्या जेवणाच्या पध्दतीचा अंदाज घेवून आपण मसाल्यांची प्रमाणे देतो. काही तयार मसाले नेतात. त्यामधे रोजच्या मसाल्यांसोबत गरम मसाल्याचे प्रमाण महिला नेहमी मागतात.  म्हणून आज एक ढोबळमानाने वापरले जाणारे गरम मसाल्याचे प्रमाण देत आहोत.

हा गरम मसाला बनवताना त्यामधे मिरची पावडर व हळद पावडर घालत नाहीत. कोणतीही शाकाहारी वा मांसाहारी भाजी बनवताना ह्याचा उपयोग होतो. अगदी मसाले भात किंवा बिर्याणी पुलाव, पॅटीस, शाही पंजाबी भाज्यांसाठी देखिल वापरता येतो. नुसत्या या मसाल्यावरही पदार्थ छान लागतात आणि इतर बहुतांशी मसाल्यासोबतही हा पदार्थामधे वापरला जातो. तसेच एकदा मसाला बनवून डब्यात ठेवला कि सहा सात महिने मस्त राहतो.

तर बघुया काय अख्ख्या मसाल्याचे घटक लागतात गरम मसाला बनवण्याकरीता:
धणे: (coriander seeds): 200 Gram ( काही जण धणे घालत नाहीत)
जीरे: (cumin seeds): 160 Gram
काळेमिरे: (black pepper): 120 Gram
लवंग: (cloves): 60 Gram
दालचिनी: (cinnamon): 100 Gram
जायवंत्री: (Mace): 40 Gram
रामपत्री: (Rampatri): 40 Gram
मसाला वेलची: (Black cardamom): 60 Gram
शहाजीरे: (Caraway seeds): 60 Gram
वेलदोडा/ हिरवी वेलची: (Green Cardamom): 60 Gram
हिंग: (Asafoetida): one teaspoon
बादियान/चक्रिफुल: (Star anise): 50 Gram
तमालपत्र: (Bay Leaf): 30 Gram

वरील सर्व मसाल्याचे पदार्थ चांगल्या दर्जाचे, ताजे व कोरडे असावेत. ते नीट स्वच्छ निवडून घ्या. मग एक एक करीत हिंग सोडून सारे जिन्नस गरम तव्यावर एखाद मिनिटासाठी न करपवता व न जाळता हलकेसे शेकून घ्या.
(तुम्ही हाताला कुकिंग तेल लावून हलकेच मसाल्यांवरदेखिल फिरवून मग मसाले तव्यावर टाकू शकता. ह्याने मसाला अजून छान लागतो आणि गडद दिसतो आणि चांगला टिकतो.)

शेकलेले मसाले पुर्ण थंड होऊ द्या. मग मिक्सरमध्ये नीट बारीक पावडर करून घ्या. तुम्हाला जाडसर भरड हवा असल्यास मिक्सरला कमी फिरवा.
झाला तुमचा गरम मसाला तयार! मिक्सरमधून काढल्याबरोबर डब्यात भरू नका. गरम असल्याने बाष्प धरून मसाला खराब होऊ शकतो. थंड झाला की चांगल्या बरणीत भरून वापरा.

वरील कोणत्याही अख्ख्या मसाल्याच्या जिन्नसाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी अधिक करू शकता.
● सौम्यपणा अधिक हवा असल्यास धणा व जीरे चे प्रमाण वाढवा व काळेमिरे, लवंगाचे प्रमाण कमी करा.
● तिखट व उग्र गरम मसाला हवा असल्यास धणा, जीरे चे प्रमाण कमी व काळेमिरे व लवंगाचे प्रमाण वाढवा. शक्यतो काळेमिरेचे प्रमाण वाढवावे कारण लवंगाचा जहाल तिखटपणा त्रासदायक वाटू शकतो.
● थोडा जायका वाढवायचा असल्यास मसाला वेलची, हिरवी वेलची, शहाजीरे, जायवंत्री जास्तीची घालावी.
● काहीजण आजकाल, जायक्यासाठी थोडी कसूरी मेथी व all spice ची सुकी पानेदेखिल घालतात. मी कधी तसे वापरून न पाहिल्याने वरती लिहीलेले नाही.
● काहींच्या गरम मसाला प्रमाणांत कबाबचिनी, नाकेशर, खसखस, दगडफुल, एखादे जायफळचादेखिल समावेश असतो.
● ह्याच गरम मसाल्यातला निम्मा मसाला काढून त्यात पाव किलो काश्मिरी मिरची पावडर, पाव किलो बेडगी मिरची पावडर व पाव किलो पटणा मिरची पावडर घातली की मस्त रोजच्या जेवणात वापरायचा मसाला तयार होतो.

तर मग छानपैकी घरी गरम मसाला बनवून चविष्ट जेवण बनवा. आणि नाहीच वेळ मिळाला तर आमचा तयार लक्ष्मी मसालेचा स्पेशल गरम मसाला Online घरपोच मागवा.

#garam_masala #fresh_spice_blends
#laxmi_masale #laxmi_masale_edwan #the_masala_bazaar #masala_bazaar_virar



1 comment:

  1. Thanks for this. I really like what you've posted here and wish you the best of luck with this blog and thanks for sharing. Tea to detox

    ReplyDelete