काही प्रथा- परंपरेने चालत न आलेल्या पण सवयीने रूढलेल्या, आवडल्या म्हणून सहज अंगिकारलेल्या अन्नपदार्थांच्या चविष्ट पध्द्तींपैकी हि जलेबी-फाफडा! 😛
विरार मधे रहात असलेल्यांना निश्र्चितच माहित असलेली लोकप्रिय अशी अंबिका, मजिठिया आणि SK अशी ताज्या, चविष्ठ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई मिळण्याची प्रसिद्ध दुकाने. स्वातंत्रदिन, महाराष्ट्र दिन, दसरा आणि प्रजाकसत्ताक दिन ह्या दिवशी शास्त्र असल्याप्रमाणे नास्त्याला घरी आणि व्यवसायांच्या ठिकाणच्या स्टाफ ला आवर्जून अगदी १००% ठरलेले पदार्थ असतात, ते म्हणजे स्टेशनजवळच्या अंबिकामधून गरमागरम जलेबी (जिलबी), ओवा घातलेला फाफडा, चविष्ट समोसा आणि सोबत असते हिरव्या मिरच्या- कच्च्या पपईची कोशिंबीर तोंडी लावायला... एडवणला पण स्वातंत्रदिन-प्रजाकसत्ताक दिनाला घरी, व्यवसायाच्या ठिकाणच्या कामगारांना, साईबाबांच्या देवळात शेव-बुंदी, वडापाव असाच नास्ता आणायची पध्द्त... आणि हो आमच्याप्रमाणेच बहुतांश घरीदेखील बहुधा हाच मेन्यू असतो न्याहरी ला त्यामुळे दुकानांवर ही तौबा गर्दी!
आज बाबांनी आणलेला हा नास्ता सर्व्ह करताना अचानक लक्षात आले की जुळून आलेय हो तिरंगी रंगसंगती आपसूकच 😁😛 म्हणून जरा दिनविशेष फोटो-बिटो प्रकार...
आपल्या सर्वांनाच ७५ व्या स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा! 🇮🇳👳
बलसागर भारत होवो! विश्वात शोभुनी राहो!! ❤️✨
#75thindependenceday #virar #edwan #foodmemories #Independence_Day #food #jalebi #fafada
No comments:
Post a Comment